महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त ; शरद पवारांनी जागवल्या राजीव सातव यांच्या आठवणी

Maharashtra Today

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदारराजीव सातव (Rajiv Satav)यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनीही ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. तसेच, खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले .

काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली.

 

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button