बदलापुर येथे २२ एकर जागेत बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक; आठ महिन्यांत पूर्ण होणार

Balasaheb-thackeray

बदलापूर :- मुंबई (Mumbai) शहराला लागून असलेल्या बदलापुरात तब्बल २२ एकर जागेत बाळासाहेब ठाकरें (Balasaheb Thackeray) भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. आठ महिन्यांत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट नगर परिषदेने ठेवले आहे.

शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने बदलापूर नगर परिषदेने २२ एकर जागेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारून अद्ययावत साहित्य नगरी निर्माण करण्याच निर्णय घेतला आहे. येत्या आठ महिन्यांत या स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती नगर परिषदेने दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या अंगीकृत असलेल्या कला आणि साहित्याचा आढावा वाचण्यासाठी तरुणाईला पुस्तक नगरी, बाळासाहेबांची भाषणे अशा विविध प्रकारच्या साहित्याचं विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बदलापूर नगर परिषदेने हाती घेतला आहे. बदलापूरजवळील वालीवली गावचा डोंगर परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. येत्या आठ महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. तर यास्मारकाला उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी स्मारक म्हणून बनवू, अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांचे स्मारक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? संदीप देशपांडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER