मेहुल चोकसीच्या सहका-याला 12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

Choksi's associate

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचा एक सहकारी दीपक कुलकर्णीला न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कोठडी सुनावली आहे.

दीपक कुलकर्णी याला कोलकात्यातून ५ नोव्हेंबरला विमानतळावरून अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयनं संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली.