कुर्ला : मेहता बिल्डिंग परिसराला आग

Fire at Kurla

मुंबई : कुर्ला येथील मेहता बिल्डिंग परिसराला शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी आग विझवली.

आग पेटली असताना स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. आग सिलेंडरच्या स्फोटाने लागली, अशी शंका व्यक्त करण्यात येते आहे. आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले आहे.