क्वारंटाईन सेंटरसाठी मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेज पालिकेने घेतले ताब्यात!

Mehboob Studio for Quarantine Center, taken over by Xavier's College Municipality!

मुंबई :- दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासन संकटाला तोंड द्यायची जय्यत तयारी करत आहे. विलगीकरण केंद्रासाठी महापालिकेने वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओसह फोर्ट झेवियर्स, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि माटुंगाचे  डी. जी. रूपारेल कॉलेज ताब्यात घेतले आहे.

महापालिकेने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एमएमआरडीए मैदानात आणि गोरेगावमधील नेस्को येथे विलगीकरण केंद्र उभारले आहे. आता मेहबूब स्टुडिओ, फोर्ट झेवियर्स, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि रूपारेल कॉलेज ताब्यात घेतले आहे. या जागा विलगीकरणासाठी वापरण्यात येतील, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

मेहबूब स्टुडिओमध्ये सुमारे १००० खाटांची सोय करण्यात आली आहे. सेंट झेवियर्स कॉलेज आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथेही खाटांची सोय करण्यात आली आहे. माटुंगाच्या डी. जी.  रूपारेल कॉलेजचे सभागृहही ताब्यात घेण्यात आले आहे.

‘एच पूर्व’ या वॉर्डमध्ये एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ३५ पेक्षा जास्त रुग्णांचा मत्यू झाला आहे. ‘एच पश्चिम’मध्ये ४१९ रुग्ण आढळले असून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शास्त्रीनगर, खार दांडा आणि गझरबंध याभागातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

आयकॉनिक सेंट झेवियर्स कॉलेजचा हॉल आणि कँटिनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना ठेवण्यात येणार आहे. १८० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. कॅम्पसमधील झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रीसर्च बिल्डिंगच्या छतावर ७० खाटांची व्यवस्था केली आहे. याशिवाय जे. जे.  स्कूल ऑफ आर्ट्सच्या हॉलमध्येही ८० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.


Web Title : Mehboob Studio-Xavier’s College for quarantine center detained by municipality

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER