मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा रामचरणला कोरोनाची लागण

Ram Charan

कोरोनाने सगळ्या जगाला विळख्यात घेतलेले आहे. कोरोनावर लस (Corona Vaccine) तयार करण्याचे काम जवळ जवळ अंतिम टप्प्यात आहे. सगळे जण कोरोनाची लस कधी येईल याची वाट पाहात आहेत. तर दुसरीकडे लस नसतानाही केवळ औषधं आणि काळजी घेतल्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना दिसत आहे. असे असले तरी कोरोनाची लागण होत असलेल्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. जगभरातील कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आणि होत आहे. दक्षिणेतील सुपरस्टार रामचरण यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

रामचरणने (Ram Charan) स्वतःच सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. चिंरजीवी हा दक्षिणेतील मेगास्टार आहे. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून त्याचा मुलगा रामचरणही सिनेमात आला आणि त्यानेही पित्याप्रमाणेच प्रचंड यश मिळवले. रामचरणने पित्याप्रमाणे हिंदीतही पाऊल टाकले होते. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. रामचरणला कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अभिनेता चिरंजीवीलाही कोरोनाची लागण झाली होती. रामचरणने ट्विटरवर याबद्दलची माहिती दिली. मात्र कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी तो काही दिवस घरीच क्वारंटाईन  राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

रामचरण सध्या ‘आचार्य’ सिनेमात काम करीत असून दोन दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या सिनेमात चिरंजीवी मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमाची निर्मिती रामचरण आणि निरंजन रेड्डी करीत आहेत. रामचरणने ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र मी घरीच क्वारंटाईन राहात आहे. कोरोनातून लवकरच बरा होऊन परत येईन अशी आशा करतो, असेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्यांनीही कोरोनाची टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनही त्याने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER