काँग्रेसमध्ये ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ची मेगा भरती !

Congres & Social media

मुंबई :- भाजपाच्या सोशल मीडियावरच्या प्रचाराला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने ‘सोशल मीडिया वॉरियर्स’ची मेगा भरती केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता (Rohan Gupta) यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने अभिजित सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची ४२८ पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली मेगा कार्यकारिणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत ४८ जिल्हाध्यक्ष, २५२ विधानसभा अध्यक्ष, ११८ प्रदेश कार्यकारिणी सदस्य व एक कोअर कमिटी सदस्य आहेत.

२०१९ च्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्याचे व लॉकडाऊनच्या काळात पक्षाची भूमिका जनतेतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम सोशल मीडिया विभागाने अतिशय प्रभावीपणे केले. आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम मेगा कार्यकारिणी करेल, असा विश्वास अभिजित सपकाळ यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेली सक्रियता, संघटन कौशल्य, तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक वापर, अशा विविध गोष्टींचा विचार करून मोठ्या छाननी प्रक्रियेतून या ४२८ पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस-शिवसेनेत पुन्हा जुंपणार, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER