२३ जानेवारीपर्यंत मेगाभरतीवर बंदी !

mumbai high court

मुंबई :- मराठा आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर बुधवारी म्हणजेच आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याच संदर्भात उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर २३ जानेवारीपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. तसेच २३ जानेवारीपर्यंत मेगा भरतीचीही प्रक्रिया सुरु करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

मागच्या महिन्यात सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला. शासकीय पदावर कोणत्याही प्रकारच्या मेगा भर्तीची प्रक्रिया सुरू केलेली नाही. तसेच पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही नेमणूक केली जाणार नाही, अशी हमी महाराष्ट्र शासनाने न्यायालयाला दिली आहे.