मनसेत मेगा भरती, कृष्णकुंजवर इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

MNS

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) आता सुगीचे दिवस आले आहे. मागील काही महिन्यांपासून मनसेत मोठ्याप्रमाणात इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहे. आजही मुंबईतील विविध भागातील इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेचा झेंडा आपल्या हाती घेतला. तर दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, आज नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्याच्या शहराध्यक्षपदी डॅशिंग नेते वसंत मोरे यांची नियुक्ती केली होती. त्यापाठोपाठ पुण्यातील मनसेची कार्यकारिणीही बदलण्यात आली होती. या नव्या कार्यकारिणीतील शिलेदारांना आता राज ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. उद्या राज ठाकरे या नव्या शिलेदारांशी संवाद साधणार आहेत. या सर्वांना राज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले जाईल. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने यावेळी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. तेव्हा आता राज ठाकरे आपल्या नव्या मावळ्यांना काय आदेश देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER