मध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा तर पश्चिमवर जंबो ब्लॉक, मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा

Railway Line Block

मुंबई : उद्या रविवारी मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेकाब्लॉक आणि पश्चिम मार्गवर जंबोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मेगाब्लॉकमुले काही लोकल वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे तर काही लोकलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळ, सिग्नल आणि इतर तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. त्यामुळे आता रविवारची सुटी पाहून घराबाहेर पडण्याचा प्लॅन करणा-या मुंबईकरांना आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर निघावे लागणार आहे.

मेगाब्लॉकचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे-
1. रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मध्य रेल्वेवरील ठाणे-कल्याण डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. जलद मार्गावर मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण या मार्गावर लोकल थांबतील.

2. पश्चिम रेल्वेवर 10.35 ते 3.50 या वेळेत गोरेगाव ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून दोन्ही दिशेने जाणा-या स्लो मार्गावरील लोकल या फास्ट मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.

3. ठाणे-वाशी आणि नेरूळ दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरु राहील. सीएसएमटी ते मानखूर्द दरम्यान काही विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.

4. पनवेल ते मानखूर्द दरम्यान या हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वडाळा, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेल, या स्थानकादरम्यान 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत एकही लोकल धावणार नाही.