संभाजीराजेसोबतची भेट लांबणीवर ; उदयनराजे म्हणतात चुकीचा अर्थ काढू नका

Udayanraje Bhosale - Sambhajiraje Chhatrapati

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे . यापार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यात नियोजित असलेली बैठक आता लांबणीवर पडली आहे. शुक्रवारी पुण्यात हे दोन्ही नेते भेटणार होते. मात्र, ऐनवेळी ही बैठक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत . मात्र, उदयनराजे भोसले यांनी यावर स्पष्टीकरण दिले .

काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. संभाजीराजे आणि मी भाऊ आहोत. मी प्रत्येक कार्यात त्यांच्यासोबत आहे. माझी कामं आटोपल्यानंतर दोन-तीन दिवसांत मी संभाजीराजे यांना भेटेने, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button