हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठक; NIAचा कोर्टात दावा

court order - mansukh hiren - Nia - Maharastra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याच्या आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा एनआयएकडून तपास केला जात आहे. या प्रकरणी एनआयएने निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेला अटकही केली आहे. एनआयएने विशेष न्यायालयात धक्कादायक माहिती  दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट बैठकीत रचला गेला, या बैठकीला सचिन वाझेही उपस्थित होता, असा दावा एनआयएने केला आहे. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात एनआयएने विशेष न्यायालयाला मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली. जेव्हा मनसुख हिरेन यांची हत्या करण्याचा कट रचत होता, तेव्हा त्या  बैठकीला वाझेसोबत निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदेही उपस्थित होता. हत्येतील आरोपींना संपर्क करण्यासाठी वाझेने एका मोबाईलचा वापर केला होता, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले आहे.

७ एप्रिलपर्यंत कोठडी

दरम्यान, हिरेन हत्येमागील सूत्रधारांचे नाव एनआयएने उघड केले नाही. हिरेन हत्येचा छडा लावण्यात एनआयएला यश मिळाल्याचे एनआयएच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोर या दोघाला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.

हत्येचा हेतू काय?

हिरेन यांच्या हत्येमागचा हेतू काय होता? याबाबतही एनआयएने न्यायालयाला माहिती दिली आहे. दरम्यान, विनायक शिंदे याचे वकील गौतम जैन यांनी या हत्येत आणि षडयंत्रात शिंदे याचा हात नसल्याचे न्यायालयाला सांगितले. सीम कार्ड देण्याच्या पलीकडे कोणत्याही आरोपीला अन्य आरोपात जबाबदार धरण्यात आले नाही. गेल्या नऊ दिवसांपासून विनायक शिंदे एनआयएच्या कस्टडीत आहे. त्यामुळे कस्टडी वाढवण्याची गरज नाही, असे गौतम जैन यांनी न्यायालयाला सांगितले.

वकिलांचा युक्तिवाद धुडकावला

दरम्यान, न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद धुडकावून लावला. नरेश गोर याचे वकील आफताब डायमंडवाला यांनी या प्रकरणात केवल सीम कार्ड देण्याइतकेच गोर याचा संबंध आहे. त्यामुळे गोर याला विनाकारण कोठडीत ठेवले आहे. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून शिंदे आणि गोर यांना ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button