बैठकीला मंत्र्यांची दांडी ! अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी, गिरीश महाजन म्हणतात, परिस्थिती गंभीर

girish Mahajan & Ajit Pawar

मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीला काही मंत्र्यांनी दांडी मारली. याबाबत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांच्या या वर्तनावर टीका करताना भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणालेत, परिस्थिती गंभीर आहे.

काल (२० जानेवारी) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्री गैरहजर होते. याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजन म्हणालेत – राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे. राज्य सरकारमध्ये आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते, अशी परिस्थिती आहे. (BJP leader Girish Mahajan slams Maha Vikas Aghadi Government)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER