महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा

काँग्रेसची ११५ जागा लढण्याची तयारी शहरातील विाविध विषयांवार चर्चा

Congress Flags

औरंगाबाद :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २२) काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शहागंज येथील गांधीभवनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांसाेबत बोलतांना महापालिका निवडणुक निरीक्षक मुजफ्फर हुसेन म्हणाले, शहरात अनेक प्रश्न आहेत. रस्ते, पाणी, कचरा, कर कमी करणे या विषयावर मेळाव्यात चर्चा झाली. या चर्चेच्या आधारावर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहिरनामा तयार केला जाईल.

एकदा उभे करून द्यायचे, चालायला लागले की दूर व्हायचे, यापेक्षा जास्त सरकारशी संबंध नाही : पवार

महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत किंवा आमच्या सोबत कोणी आले नाही तर ११५ जागा लढण्याची तयारी पक्षाने केली आहे. असा इशारा हुसेन यांनी आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळी दिला. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हा मंडळ तयार करून नियोजन केले जात असल्याचे हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ही निवडणुक परिणामकारक ठरणार

मराठवाड्याची राजधानी असलेल्या आैरंगाबाद महापालिकेची निवडणुक महत्वची असून या निवडणुकीनंतर मराठवाड‌्यातील ३० नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षासाठी ही निवडणुक परिणामकारक ठरणार असल्याचे दादासाहेब मुंडे म्हणाले.