अशोक चव्हाण आणि शरद पवारांची भेट, मराठा आरक्षणासाठी केल्या सूचना

Sharad Pawar - Ashok Chavan

मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच गाजत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाकडून (Maratha Community) आंदोलनांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून एक नवा अध्यादेश काढत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विचारात आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली.

या भेटीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे अशी महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. एक नवा अद्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी आज शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी काही सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने अध्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. अध्यादेशात काय काय नमूद करावे याबाबत पवारांनी सल्ले दिले आहेत. अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER