शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक

Sharad Pawar

मुंबई : गेल्या तेरा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्या सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्व विरोधी पक्षांची ही बैठक होईल. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

शरद पवार उद्या अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होईल . या बैठकीत कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER