बारामतीत अजित पवार आणि शिवेंद्रराजेंची भेट; महिनाभरातील तिसऱ्या भेटीने उलटसुलट चर्चेला उधाण

Ajit Pawar - Shivendra Raje Bhosale

मुंबई : भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी रविवारी बारामती (Baramati) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ही भेट पार पडली. अजित पवार आणि शिवेंद्रराजे भोसले हे दोघेच एका कक्षात बसले होते. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. मतदारसंघातील कामानिमित्त अजितदादांना भेटायला आलो होतो. बाकी काहीही विषय नाही, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीला (NCP) सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. साताऱ्यातील शरद पवार यांच्या पावसातील ऐतिहासिक सभेनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र, शिवेंद्रराजे भोसले यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER