कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसाठी पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये बैठक

Kolhapur Airport

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगसाठी पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये बैठक घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय घेण्यात आला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील तीन खासदार आणि तीन आमदार या बैठकीला उपस्थित होते. बैठकीपूर्वी या सर्वच नेत्यांनी प्रत्यक्षात विमानतळावर जाऊन येथील विविध विकासकामांची पाहणी केली. लवकरच ही सर्व कामे पूर्ण करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे ठरले.

Kolhapur Airportराजाराम महाराजांचे नाव देण्यासाठी मुख्य ऑथेरिटीसोबत चर्चा करणार स्वातंत्र्यपूर्व काळी राजाराम महाराजांच्या हस्ते कोल्हापूर विमानतळाचे उद्घाटन झाले. त्यामुळे, या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी मी स्वतः विमानतळाच्या मुख्य ऑथेरिटीसोबत चर्चा करणार आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. दरम्यान, आजच्या बैठकीला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह खासदार संजय मंडलिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER