पवारांच्या घरी बैठक संपन्न; देशमुखांच्या राजीनाम्याची शक्यता, वळसे पाटील यांना गृहमंत्रीपद?

Sharad Pawar - Anil Deshmukh - Dilip Walse Patil - Maharastra Today
Sharad Pawar - Anil Deshmukh - Dilip Walse Patil - Maharastra Today

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधातील अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी १५ दिवसात पूर्ण करावी, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही वेळेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओकवर बैठक संपन्न झाली. सीबीआय (CBI) चौकशीच्या कोर्टाच्या निर्णयामुळं अनिल देशमुख राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे नाव पुढे येत आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात ३१ मार्चला युक्तिवाद झाला. परमबीर सिंग यांच्यावतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button