मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवारांमध्ये बैठक

मुंबई : मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. (Sharad Pawar meets Vishwas Nangare Patil at YB Chavan Centre)

पवारांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली होती. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र दोन्ही बैठकांमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये सशांतसिंह प्रकरणापासून काही आलबेल दिसत नाही. भेटीगाठीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. दोन दिवसांपुर्वीच संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या गुप्त बैठका वाढत आहेत असे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER