दिल्लीतील आश्वासनाप्रमाने महाराष्ट्रातही पूर्तता करा : शिष्टमंडळाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

Daulat desai

कोल्हापूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासन नुसार महाराष्ट्रात सुविधा देण्यासाठी कॉग्रेसने महाराष्ट्रात सत्ता पणाला लावावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. समितीच्या एका शिष्टमंडळाने आज, सोमवारी निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सादर केले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी कॉग्रेसने जाहीर केलेल्या आश्वासनानुसार घरगुती वापराकरता पहिल्या ३०० युनिट पर्यंत मोफत वीज तसेच घरगुती वापरा करता २० हजार लिटर पर्यंत मोफत पाणी अशी घोषणा केली.तसेच मुलींना नर्सरी ते पीएचडी पर्यंत शासकीय संकुलात मोफत शिक्षण,बेरोजगार पदवी धारकास महिना पाच हजार रूपये व पदव्युत्तर धारकास महिना ७५०० रुपये भत्ता देण्याचे आश्वासन काँग्रेस दिले आहे.तसेच दरमहा १२ हजार रुपयापेक्षा कमी उत्पन असलेल्या कुटुंबाला दरमहा सहा हजार रुपये देवू.तसेच बीपीएल खालील व्यक्तीच्या स्टार्टअपसाठी शासन पंचवीस लाख देईल, आदि आश्वासने कॉग्रेसने निवडणूक जाहीर नाम्यात दिली आहेत .

याकडे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात वीज उत्पादन दिल्लीपेक्षा अधिक होते.दिल्ली वीज बाहेरून विकत घेते.या पार्श्वभूमीवर दिल्लीत आश्वासन दिलेल्या सर्वही सहा योजनांची अमलबजावणी कॉग्रेसने महाराष्ट्रात करावी . महाराष्ट्रातील प्रस्थावित वीज दर वाढ मागे घ्यावी आदिसाठी काँग्रेस सरकारवर दबाव आणावा . दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासन नुसार महाराष्ट्रात सुविधा देण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्रात सत्ता पण लावावी ,अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.