शिवसेनेचा आज ममता दिन

Meenatai Thackeray

मुंबई : तमाम शिवसैनिकांच्या (Shiv Sena) लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांचा आज 90वा जयंती दिन आहे. त्यानिमित्त स्व. माँसाहेबांना शिवतीर्थावर आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथेही भजन–कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त दरवर्षी शिवतीर्थावर सुगम संगीत तसेच भजनाचा कार्यक्रम होतो मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम होणार नसल्याचे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाची (Corona) स्थिती लक्षात गेऊन यंदा सोशल डिस्टन्सिंग राखूनच माँसाहेबांना पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथे माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER