मीनाक्षी शेषाद्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून केले निधनाच्या अफवेचे खंडन

Meenakshi Seshadri - Maharashtra Today
Meenakshi Seshadri - Maharashtra Today

टेक्सास : १९९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) हिचे निधन झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मीनाक्षीने तिचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकून या चर्चेचे खंडन केले.

मीनाक्षीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा नृत्य मुद्रेत बगिच्यात बसलेला फोटो शेअर केला आहे. तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. याला तिने ‘डान्स पोज’ असे कॅप्शन दिले आहे.

मीनाक्षी सध्या अमेरिकेतील टेक्सास शहरात राहते. पती हरीश मैसूर आणि दोन मुले असे तिचे कुटुंब आहे. मीनाक्षीने १९८३ साली निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा तेव्हाचा ‘ब्लॉकबस्टर’ ठरला. मीनाक्षी एका रात्रीत स्टार झाली होती. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘दामिनी’ या गाजलेल्या चित्रपटातही तिने काम केले आहे. तिने राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, सनी देओल, आणि विनोद खन्ना अशा सुपरस्टार्ससोबत अनेक चित्रपटात काम केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button