वर्षांपूर्वी मीनाक्षी शेषाद्रीने दिला होता बॉलीवूडला निरोप

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीचा जन्म १६ नोव्हेंबर १९६३ रोजी झाला होता. बॉलीवूडमध्ये ८० आणि ९० च्या दशकात सौदर्य आणि अभिनयाने आपल्या चाहत्यांच्या हृदयावर एक वेगळी छाप सोडली होती. मीनाक्षी तिच्या काळातील एक सुपरहिट अभिनेत्री होती. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बरीच नाव कमावले पण इतक्या उंची गाठल्यानंतर मीनाक्षीने अचानक फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मीनाक्षीच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ.

मीनाक्षी शेषाद्रीचा जन्म झारखंडमधील सिंदरी येथे एका तमिळ कुटुंबात झाला. तिने केवळ १७ व्या वर्षी १९८१ मध्ये मिस इंडियाचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. मिस इंडियाचे विजेतेपद जिंकल्यानंतर तिने ३ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मीनाक्षीचा पहिला चित्रपट ‘पेंटर बाबू’ होता. मीनाक्षी शेषाद्रीला लोकांनी ‘हीरो’ चित्रपटात पाहिले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचा सिद्ध झाले होता. या चित्रपटात तिच्या सोबत होता जॅकी श्रॉफ. याशिवाय मीनाक्षी शेषाद्रीने ‘दामिनी’ चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले.

मीनाक्षीने तिच्या कारकीर्दीत ‘मेरी जंग’, ‘घायल’, ‘घातक’, ‘शहंशाह’, ‘घर हो तो ऐसा’ आणि ‘तुफान’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलिवूडवर सत्ता गाजवल्यानंतर मीनाक्षी शेषाद्रीने १९९५ साली गुंतवणूक बँकर (Investment Banker) हरीश म्हैसूरशी लग्न केले. लग्नानंतर मीनाक्षी अमेरिकेतील प्लानो (टेक्सास) येथे स्थायिक झाली. या दोघांनी न्यूयॉर्कमध्ये विवाह नोंदणी केली. दोघांनाही एक मुलगी व दोन मुले आहेत.

अभिनयाबरोबरच मीनाक्षीला नृत्याचीही फार आवड होती. तिने कदाचित चित्रपटांपासून अंतर ठेवले असेल परंतु स्वत:ला नृत्याशी जोडून ठेवले. टेक्सासमध्ये मीनाक्षी स्वत:चा ‘चॅरिश डान्स स्कूल’ चालवते. २००८ मध्ये, मीनाक्षी शेषाद्रीने तिची नृत्य शाळा उघडली आणि काही वर्षांत ती एक प्रसिद्ध शाळा बनली. मुलांपासून सर्व वयोगटातील लोक नृत्य शिकण्यासाठी येथे येतात.

मीनाक्षी तिच्या नृत्य शाळेत भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध प्रकारांचे ओळख करून देत आहे. मीनाक्षी स्वत: भरतनाट्यम ते कथक, कुचीपुडी आणि ओडिसी अशा नृत्य प्रकार (Dance Forms) शिकवत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER