मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडेंसह १७ खासदार करोना पॉझेटिव्ह

Meenakshi Lekhi, Anant Kumar Hegde and 17 MPs are positive

दिल्ली : मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi), अनंतकुमार हेगडे ( Anant Kumar Hegde) यांच्यासह १७ खासदारांची कोरोना चाचणी पॉझेटिव्ह आली आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांचा समावेश आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सगळ्या खासदारांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. १७ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. आज खासदारांनी अटेंडन्स अॅपने हजेरी लावली. त्यांना करोना किटही देण्यात आली, मास्क सॅनेटायझर देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचे आवरण लावण्यात आले आहे. उभे राहून बोलण्यास मनाई आहे. खासदारांना बसूनच त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत ३५९ खासदार हजर आहेत.

देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली आहे. आजपर्यंत ३७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. ७८ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.