मीना कुमारीचा कधीच हलाला झाला नव्हता – ताजदार अमरोही

Meena Kumari

कंगना रनौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत प्रख्यात अभिनय सम्राज्ञी मीना (Meena Kumari) कुमारी यांच्याबाबत बोलताना त्यांचा हलाला झाला होता असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून अमरोही परिवार प्रचंड नाराज झाला असून कंगना अनाडी आणि गांवढळ मुलगी असल्याचे मीना कुमारीच्या सावत्र मुलाने ताजदार अमरोहीने (Tajdar Amrohi) म्हटले आहे.

आता आम्ही तुम्हाला हलाला म्हणजे काय ते सांगतो. हलाला  ही एक भारतीय उपखंडातील म्हणजे भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशातील मुस्लिम समाजातील एक कुप्रथा आहे. अत्यंत दुर्मिळ अशी ही कुप्रथा आहे. या प्रथेचे आचरण लपून छपून केले जाते. एखाद्या मुस्लीम स्त्री-पुरुषाला तुझा किंवा तुझ्या जोडीदाराचा हलाला झाला आहे का? असा प्रश्न केल्यास ती किंवा तो उत्तर देणार नाही. आजही ही प्रथा सुरु असल्याचे सांगितले जाते. पती पत्नीचे पटत नसेल आणि ते वेगळे झाले. पण काही काळाने त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी परत एकत्र येण्याचा विचार केला तर पत्नीला दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करावे लागते. त्याच्याबरोबर सुहागरात साजरी करून नंतर त्याने तिला सोडले तरच ती पुन्हा पहिल्या पतीबरोबर लग्न करू शकते. यालाच हलाला प्रथा म्हणतात. त्यामुळेच कंगनाने आरोप केल्यामुळे अमरोही कुटुंबात कंगनाप्रती प्रचंड राग आहे.

ताजदार यांनी सांगितले, माझ्या छोट्या अम्मीने म्हणजेच मीना कुमारे वेगळे राहाण्याचा निर्णय घेतला होता आणि ती वेगळी राहात होती. ती नाराज होती परंतु तिने कधीही पारिवारिक गोष्टी बाहेर येऊ दिल्या नाहीत. माझे वडिल कमाल अमरोहीसुद्धा (Kamal Amrohi) त्याबाबत कधीही काहीही बोललेले नाहीत. घरातील गोष्टी घरात बसूनच सोडवल्या जातात. ते दोघे वेगळे झाले असले तरी एकमेकांचा सम्मान करीत असत. आमच्या कुटुंबाचो मीना कुमारी एक गुडविल आहे. आणि कंगनासारखी मूर्ख मुलगी आमच्या कुटुंबावर चिखलफेक करीत आहे. त्या मूर्ख कंगनाला हे ठाऊक नाही की माझी छोटी अम्मी (मीना कुमारी) एक शिया मुसलमान होती आणि माझे वडिल कमाल अमरोहीसुद्धा शिया मुसलमान होते आणि शिया मुसलमानांमध्ये हलाला प्रथा कधीच नव्हती असेही ताजदार अमरोही यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER