ध्यान केल्यामुळे मोतीबिंदु ग्रस्तांना फायदा

Meditation

नवी दिल्ली :- ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील डॉ. राजेंद्र प्रसाद नेत्र विज्ञान केंद्राच्या डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून मोतीबिंदु ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ध्यान करणे अत्यंत फायद्याचे आहे, असे स्पष्ट झाले आहे.

भारतात मोतीबिंदु हे अंधत्त्वाचे मुख्य कारण आहे. १ कोटी २० लाखांपेक्षा अधिक लोक मोतीबिंदु ग्रस्त आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद नेत्र विज्ञान केंद्राच्या डॉक्टरांनी केलेला अभ्यास ‘जर्नल ऑफ ग्लुकोमा’मध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासांतर्गत ९० मोतीबिंदु ग्रस्तांची निवड करण्यात आली होती. या रुग्णांना दोन गटात विभागण्यात आले होते. एक औषधांसह दररोज प्राणायाम आणि ध्यान करणारे आणि दुसरे केवळ औषध घेणारे. त्यात औषधासह ध्यान करणाऱ्या रुग्णांना चांगला फायदा झाल्याचे समोर आले आहे. म्हणून मोतीबिंदु ग्रस्तांना नियमित ध्यान करणे फायद्याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.