
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणाला आता नवे वळण आले आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरुण राठोड नावाच्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात केल्याची नोंद आहे. त्यामुळे पूजा अरुण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का? अशी शंका निर्माण झाली असून, याबाबत रुग्णालयाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण नाव पूजा आणि त्यानंतर ह्या प्रकरणात अरुण राठोडचं असलेलं कनेक्शन यावरून पूजा चव्हाण हीच पूजा अरुण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे मंत्री आणि अरुण राठोड यांची ही व्हायरल ऑडिओ क्लिप आहे, त्यातही प्रेग्नंसीबाबत संभाषण आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.
पूजा अरुण राठोड ही ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक-३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचे रिपोर्टमध्ये नमूद आहे. संबंधित डॉक्टरांशी संपर्क केला पण ते नॉट रिचेबल आहेत. मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात राहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती.
भाजपने (BJP) रीतसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नावही उघड झालं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला