एमडीएच मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

Mahashay Dharampal Gulati

मुंबई :- जगात आपल्या मसाल्यांची छाप सोडणारे एमडीएच (MDH) मसाल्यांचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati) यांचं निधन झालं. आज पहाटे ५.३८ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय ९८ वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली आणि गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केवळ पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी बड्या उद्योगपतींना मागे टाकत २०१७ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. ‘एमडीएच’ची वार्षिक उलाढाल १५०० कोटींच्याही वर आहे. त्यांच्या कंपनीकडे १५ कारखाने असून १००० डिलर्सचं जाळं आहे. महाशय धर्मपाल गुलाटींना त्यांच्या मसाले उद्योग क्षेत्रातील यशासाठी त्यांना २०१९ मध्ये ‘पद्म भूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार धर्मपाल गुलाटी यांना प्रदान करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER