एमसीसी म्हणते, कसोटी सामने पाच दिवसांचेच व्हावेत

MCC firmly stood behind five day Tests

लंडन :- क्रिकेटचे नियम ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मेरिलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) च्या स्थानिक समिती व जागतिक समितीने कसोटी सामने पाच दिवसांचेच खेळले जावेत याला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने कसोटी सामने चार दिवसांचे खेळविण्याच्या चालविलेल्या हालचालींना मोठा धक्का बसला आहे.

यासंदर्भात एमसीसीने मंगळवारी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एमसीसी क्रिकेट कमिटी आणि एमसीसी वर्ल्ड क्रिकेट कमिटीने आयसीसीच्या या विचाराधीन बदलाबाबत नुकतीच चर्चा केली आहे. चार दिवसांच्या सामन्यांचे काही फायदे असले तरी एमसीसीच्या दोन्ही समित्यांना असे वाटते की कसोटी सामने आता सुरू आहेत तसेच पाच दिवसांचेच खेळले जावेत.