MBBS अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ मार्चपासून!

MBBS Exam

मुंबई :- ८ मार्चपासून एमबीबीएसच्या (MBBS) अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षा केवळ ऑफलाईन मोडमध्ये घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही, असे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसने म्हटले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी परीक्षा ऑनलाईन करण्याचे आवाहन केले होते. पण, अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने ‘एमयूएचएस’ने ऑनलाईन परीक्षा घेण्यास नकार दिला.

महाराष्ट्र  युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ  सायन्सेसचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी यासंदर्भात एका माध्यम अहवालात सांगितले की, राज्यभरात विविध प्रकारची क्षेत्रे आहेत, ज्यात बरीच महाविद्यालये दुर्गम, डोंगराळ भागात आहेत. या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार.

नुकतेच ‘एमबीबीएस’सह इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांसाठी ‘एमयूएचएस’ने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक रिशेड्यूल केले आहे. यापूर्वी ही परीक्षा २८ फेब्रुवारीला होणार होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ८ मार्चपासून या परीक्षा सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे १० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून सुरू होतील.

अजित पाठक यांनी सांगितले की, “अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आता या परीक्षा घेण्यात येणार आहेत. एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षांबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER