जिगरबाज मयूर शेळकेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; रेल्वेकडून ५० हजारांचे बक्षीस

Mayur Shelke - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दूरध्वनी करून वांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्‍या ‘मयूर शेळके’ याचे कौतुक केले आहे. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. कल्पनेच्या पलीकडचे काम केलेत तुम्ही.” अशा शब्दात ठाकरेंनी मयूरचे (Mayur Shelke) कौतुक केले.

काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वेस्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवरून चालत असताना तिच्या मुलाचा तोल गेला आणि तो रेल्वे रुळावर पडला. त्याच वेळी समोरून भरदाव वेगाने एक्सप्रेसही येत होती. अशा परीस्थितीत अवघ्या सात सेकंदांत मयूर शेळके याने लहान मुलाचा जीव वाचवला. मयूर शेळके हा रेल्वे पॉइंट्मन म्हणून वांगणी मध्ये कार्यरत आहे. या थरारक साहसाचा व्हिडीओही प्रसिद्ध झाला. मयूरच्या जिगरबाज कामगरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मयूरच्या या कौतुकास्पद कामामुळे रेल्वेकडून त्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही मयूरला फोन करून कौतुक केले. त्याच्या कार्याची दखल घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्याचे कौतुक केले.

नेमकं काय घडलं?
वांगणी स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी ५ वाजून ०३ मिनिटांनी एक मुलगा आपल्या आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. चालताना त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला तेव्हा नेमके त्याच वेळेला एक्सप्रेस मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची आई अंध असल्याने तिला काही करता येत नव्हते. ती मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. मायच्या हातून मुलाचा हात सुटल्याने ती कावरीबावरी झाली होती. तितक्यातच उदयन एक्सप्रेस धडधड आवाज करत स्टेशनच्या दिशेने वेगाने येत होती. लहान मुलगा ट्रॅकवर पडला आणि स्वतःच्या प्रयत्नाने प्लॅटफॉर्मवर चढत होता. मात्र, प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तेवढ्यातच मयूर शेळकेने आपले जीव धोक्यात टाकून त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button