नगराध्यक्षाच्या खुर्चीला चपलांचा हार; भेट म्हणून ठेवली बेशरमची फांदी!

- शहरातील घाणीबद्दलचा संताप

Wardha Arvi Nagar Parishad BJP Corporator Fight

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून आर्वी शहरात सफाई होत नसल्याने सगळीकडे  दुर्गंधी पसरली आहे. याचा निषेध म्हणून नगरसेवकांनी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे (Prashant Savvalakhe) यांच्या खुर्चीला चपलांचा हार (slippers garland to chair) घातला आणि भेट म्हणून खुर्चीजवळ बेशरमची फांदी ठेवली.

काही दिवसांपासून कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने शहरातील कचरा संकलन बंद आहे. शहरात घाण होऊन दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. हे सर्व नगराध्यक्षाच्या कारभारामुळे निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे. आर्वी नगरपरिषदेत भाजपाची ( Arvi Nagar Parishad) एकहाती सत्ता आहे.

सर्व २२ नगरसेवक आणि नगराध्यक्षही भाजपाचे आहेत. यामुळे भाजपामधील अंतर्गत कलहामुळे हे आंदोलन झाले, अशी चर्चा आहे. या निषेध आंदोलनात आरोग्य सभापती गंगा सुभाष चकोले, गट नेता प्रशांत ठाकूर, नगरसेवक जगन गाठे, माजी आरोग्य सभापती रामू राठी, प्रकाश गुल्हाने, हर्षल पांडे, मिथुन बारबैले, मनोज कसर, कैलास गळहाट, उषा  सोनटक्के आणि इतर नगरसेवकांनी भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER