
रत्नागिरी : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील व्यवहार सुरळीत राहावेत यासाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी प्रशासनाची बैठक घेतली व या बैठकीमध्ये प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आल्या.
विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून चिपळूण नगर परिषदेच्या विकासकामांचा कारभार ठप्प आहे. पूर्वीची सुरू असलेली कामे व मंजूर असलेली कामे धीम्या गतीने सुरू आहेत. नव्या कामांबाबत नगरसेवकांची सर्वसाधारण सभा घेता येत नसल्याने विकासकामांबाबत ठोस निर्णय घेतला जाऊ शकत नाही.
परिणामी पावसाच्या हंगामात शहरामध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार होऊ नयेत, शहराची स्वच्छता राहावी, पूरपरिस्थितीमध्ये प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती मदत मिळावी, स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा आदी बाबींवर चर्चा व नियोजन करण्यासाठी नगराध्यक्षा खेराडे यांनी या बैठकीत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला