महापौर संदीप जोशी पदवीधर मतदारसंघ निवडणूक’ लढणार?

Sandeep Joshi

नागपूर :- भाजपकडून आता मिशन ‘पदवीधर मतदारसंघ निवडणूक’ सुरु झालं आहे. पुढची रणनीती आखण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपुरात (Nagpur) मुक्कामास आहेत. भविष्यात महापालिका निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेले नागपूरचे महापौर संदीप जोशीही निवडणुकीच्या रेसमध्ये असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. भाजपचे नागपूर पदवीधर मतदारसंघातील आमदार अनिल सोले निवृत्त झाल्यानंतर आता भाजपच्या इच्छुकांनी या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात ठाण मांडून बसले आहेत.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. भाजपकडून नागपूरचे महापौर संदीप जोशी रेसमध्ये आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास तयार असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं आहे.

आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल? असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी (Sandeep Joshi) यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं २० ऑगस्टला आपल्या वाढदिवशी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जोशींनी आता पदवीधर मतदारसंघाची वाट पकडल्याची माहिती पुढे आली आहे.

काय म्हणाले होते संदीप जोशी?

अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतो की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं संदीप जोशी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER