चिमकुल्याच्या नाल्यात वाहून गेल्याप्रकरणी महापौर म्हणाले, नागरिकांना सिव्हिक सेन्स नाही

मुंबई : गोरेगाव येथे दीड वर्षांचा लहान मुलगा नाल्यात पडून वाहून गेल्याने त्याचा हकनाक बळी गेला. यामुळे मोठ्या प्रमाणात लोक संताप व्यक्त करत आहेत. मात्र यादरम्यान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट देऊन मुंबईकरांनाच दोष देत त्यांना जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले, मुंबईकरच गटारांची झाकणे उघडी ठेवतात. त्यांना सिव्हिक सेन्स नल्याचे महापौर म्हणाले.

गोरेगावचे खापर महापौरांनी स्थानिक लोकांवरच फोडले आहेत ते म्हणाले येथील लोकच गटारांवरील झाकणं काढत असतात. त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. गटार स्थानिकांनी तोडले कि प्रशासनाने झाकणंच बसवलं नव्हते हे पाहावे लागेल.पालिकेकडून वारंवार विनंतही करूनही लोक कचरा टाकण्यासाठी गटारावरील झाकणे तोडतात. मुंबईकरांना सिव्हिक सेन्स नसल्याचे ते म्हणाले.

गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे ही घटना घडली बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेडकर नगरमधील रहिवाशांनी रास्तारोको करत आपला संताप व्यक्त केला.