महापौर किशोरी पेडणेकर यांनी फ्लॅट हडपला; किरीट सोमय्या यांचा आरोप

- अनिल परब यांनी म्हाडाची जागा बळकावली !

Kishori Pednekar-Kirit Somaiya.jpg

मुंबई :- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी वरळी भागातील एसआरए सोसायटीमधील फ्लॅट हडपला, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला.

पत्रपरिषदेत याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रमांक-२ मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रमांक-१ मधील कार्यालय (केआयएस कॉर्पोरेशन सर्व्हिसेस) महापौर किशोरी पेडणेकर यांनी हडपले आहे. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनात एका व्यक्तीला आणि ऑफिस हे गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आले होते. आता हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतो. किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्रांसह याबाबत एक ट्विट केले आहे.

सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केला. म्हणाले – परब यांच्या मुंबईतील (Mumbai) अनधिकृत कार्यालयासही मी भेट दिली आहे. म्हाडाने त्यांना यासंदर्भात नोटीस बजावल्याचेही कबूल केले आहे, असे त्यांनी म्हटले. अनिल परब यांनी म्हाडाची जागा बळकावून अनधिकृत कार्यालय उभारले आहे, असा सोमय्या त्यांचा आरोप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER