महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह

Kishori Pednekar Corona positive

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना कोरोनाची (Corona virus) लागण झाली आहे. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह (Corona positive) आली आहे. सध्या त्यांची स्वॅब टेस्ट (Swab test) घेण्यात आली आहे. कोणतीही लक्षणं नसल्यानं त्यांनी घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. महापौरांच्या घरातील सदस्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ‘मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली. कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे. माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, असे त्या म्हणाल्या .

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER