महापौर आजरेकर यांनी केली रस्त्यांची स्वच्छता

कोल्हापूर : शहरात रविवारी महापालिकेने राबविलेल्या महास्वच्छता अभियानात महापौर निलोफर आजरेकर यांनी सहभाग नोंदविला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह हातात झाडू घेत महापौरांनी शहरात स्वच्छता केली. या मोहिमेत अनेक सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत तब्बल आठ टन कचरा आणि प्लॅस्टिक जमा केल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी : आमदार राणाजगजितसिंह पाटील

महास्वस्छता मोहिमेचा हा त्र्येचाळीसावा रविवार होता. त्यात शहरातील जेष्ठ नागरीक, स्वरा फौंडेशन कार्यकर्ते, स्वच्छता दुत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी स्वंयसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेची सुरवात झाली. स्वरा फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

गांधी मैदान, पंचगंगा नदी घाट, लक्ष्मीपुरी परिसर, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप व माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी मार्केट, हुतात्मा पार्क, टेंबलाईवाडी उड्डान ते लोणार वसाहत मेनरोड तसेच कळंबा तलाव या परीसराचीही स्वच्छता या मोहिमेत करण्यात आली. संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फूले हॉस्पीटल येथे बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जयंती निमित्त हॉस्पीटल परिसरात वृक्षारोपन करुन सावित्रीबाई फूले हॉस्पीटलची स्वच्छता केली.