खा. संभाजीराजे यांची महापौर आजरेकर यांनी मागितली जाहीर माफी

Mayor Ajrekar apologizes to Sambhaji Raje.jpg

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षणावर (Maratha reservation) मागणी करून भेट देत नाहीत, म्हणून महापालिकेचे सभागृह तहकूब करत असल्याचे पत्रक काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापौर निलोफर आजरेकर (Nilofar Ajrekar) यांनी काढले. या प्रकारावर खा. संभाजीराजे यांनी मी व्यक्तिशः पंतप्रधान मोदी यांना कधीही भेटू शकतो. असे राजकारण करू नका. गॅस पाईपलाईन आणि स्टेडियमच्या रखडलेल्या कामांना मंजुरी द्या, अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली होती.

यानंतर महापौर आजरेकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की,महानगरपालिकेची 25 सप्टेंबरला महा मराठा आरक्षणासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या संदर्भात राज्य शासनाला जबाबदार धरून बाबत केंद्र शासनाचा निषेध करून व मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा दर्शवून तहकूब करण्यात आली होती. छत्रपती घराणे हे कुठलाही पक्ष, जात, धर्म पाहून काम करीत नसून ते केवळ समाजासाठी काम करतात याची आम्हांस पूर्ण कल्पना आहे. याच संदर्भाने आदरणीय खा. संभाजीराजे छत्रपती व सर्व खासदार यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट न दिल्याबाबतच्या बातम्या विविध वर्तमानपत्रे तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचनात आल्यामुळेच समस्त कोल्हापूर वासियांसह आमचीही अस्मिता दुखावली गेल्याच्या भावनेतून आम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोल्हापूर छत्रपती घराणे ही तमाम शाहूप्रेमी व कोल्हापूर वासियांच्या आदर, श्रध्दा व अस्मितेची बाब असल्याने आम्ही प्रांजळपणे आपल्या भावना व्यक्त केल्या असून यामध्ये खा. छत्रपती संभाजीराजे यांना कोणतेही प्रकारे दुखवण्याचा अथवा या माध्यमातून राजकारण करण्याचा आमचा हेतू नव्हता. संपूर्ण देशामध्ये आरक्षणाचा पहिला निर्णय तसेच कायदा करणाऱ्या कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आमचे श्रध्दास्थान असून कोल्हापूरचे छत्रपती घराण्याविषयी आम्हांस प्रचंड आदर आहे.

संभाजीराजे यांनी मोठया प्रयत्नाने कोल्हापूर शहरासाठी केंद्र शासनाकडून गॅस पाइपलाइनची योजना मंजूर करून आणली याचा आम्हालाही सार्थ अभिमान असून सध्या कोरोना साथीचे उद्रेकामुळे राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावलीमुळे या विषयाबाबत सभागृहात चर्चा करणे अशक्य झाले आहे. तरी मंजुर गॅस पाइप लाइन योजना ज्या भागातून जाणार आहे तेथील सर्व नगरसेवकांशी लवकरच आम्ही बैठक घेवून चर्चा करणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER