मायावतींच्या भाऊ-वहिनीची चार अब्जची मालमत्ता जप्त

Mayawati brother's assets worth 4 billion seized

आयकर विभागाने बसपप्रमुख मायावती यांच्या भाऊ आणि वहिनीची सुमारे चार अब्ज रुपयांची नोएडामधील मालमत्ता (बेनामी प्लाट) जप्त केली. ही जागा सुमारे सात एकर आहे. या प्रकरणी मायावती यांचीही चौकशी होऊ शकते.


नवी दिल्ली : आयकर विभागाने बसपप्रमुख मायावती यांच्या भाऊ आणि वहिनीची सुमारे चार अब्ज रुपयांची नोएडामधील मालमत्ता (बेनामी प्लाट) जप्त केली. ही जागा सुमारे सात एकर आहे. या प्रकरणी मायावती यांचीही चौकशी होऊ शकते.

मायावतींचे भाऊ आनंदकुमार आणि पत्नी विचित्रलता यांच्या संपत्तीबाबत चौकशी सुरू होती. यात १६ जुलैला ही बेनामी संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यात आला व १८ जुलैला जप्तीची कारवाई करण्यात आली. पुढे आनंदकुमार यांच्या आणखी काही संपत्ती जप्त होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संपत्तीचा तपशील मात्र मिळालेला नाही.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मायावती यांनी नुकतीच आनंदकुमार यांची बसपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.