अजित पवारांशी पंगा घेतल्यानेच आम. अनिल भोसलेंना अटक झाल्याची चर्चा

Anil Bhosale-Ajit Pawar

मुंबई : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (२५ फेब्रुवारी) रात्री उशिरा अटक केली. त्यांच्यासह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी पंगा घेतल्यानेच भोसले गजाआड झाल्याचे उघड झाले आहे.

भोसले यांच्यासह तानाजी पडवळ शैलेश भोसले,एस. व्ही जाधव हे पोलिसांच्या ताब्यात आहेत.शिवाजीराव भोसले बँकेत कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठेवीदारांची फसवणूक झाल्याप्रकरणी ११ जणांना विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात भोसले आणि त्यांचे काही नातेवाईक अडचणीत आले होते.

भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधान परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आले. त्यानंतर मात्र, पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांचे तिकिट कापण्यात आल्याने भोसले नाराज झाले आणि त्यांनी भाजपाशी जवळीक साधली. या निवडणुकीत त्यांच्या पत्नी रेश्मा या भाजपायाच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. तेव्हा अनिल भोसले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वैर निर्माण झाले. मात्र, भाजपात आपल्याला फारशी किमत मिळत नसल्याने भोसले दांम्पत्य गेल्या काही दिवसांपासून भाजपातही नाराज होते.

त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपकांत जाण्याच्या प्रयत्नात ते होते. मात्र, महापालिका निवडणुकीत भोसले यांनी अजित पवार आणि काही नेत्यांवर वैयक्तिकरित्या तोंडसुख घेतल्याने अजित पवार त्यांच्या चिडले होते. या पार्श्वभूमीवर भोसले यांना अटक झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

भोसले सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक