आयपीएलमध्ये विकेट न गमावता जिंकलेले सामने

दुबईत रविवारी किंग्ज इलेव्हनच्या (Kings XI) गोलंदाजांनी जंग जंग पछाडले पण त्यांना सुपर किंग ठरलेल्या चेन्नईच्या एकाही फलंदाजाला काही बाद करता आले नाही. शेन वॉटसन (Shane Watson) व फाफ डू प्लेसीस (Faf du Plessis) यांनी 181 धावांची सलामी देत चेन्नईला 14 गडी राखून विजय मिळवून दिला आणि आपण सुपर किंग का आहोत हे दाखवून दिले.

चेन्नईचा हा विजय म्हणजे आयपीएलमध्ये (IPL 2020) एकही गडी न गमावता दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करुन दिलेला विजय होता. याआधी 2017 मध्ये केकेआरने ख्रिस लीन व गौतम गंभीरच्या 184 धावांच्या सलामीआधारे गुजराथ लायन्सवर विजय मिळवला होता.

आयपीएलमध्ये विकेट न गमावता गाठलेले सर्वाधिक लक्ष्य

184- कोलकाता वि. गुजराथ लायन्स -2017
(ख्रिस लीन व गौतम गंभीर)
179- चेन्नई वि. किंग्ज इलेव्हन पंजाब – 2020
(फाफ डू प्लेसीस व शेन वॉटसन)
163- मुंबई वि. चेन्नई सुपर किंग्ज- 2012
(सचिन तेंडूलकर व ड्वेन स्मीथ)
155- डेक्कन वि. मुंबई इंडियन्स – 2008
(अॕडम गिलख्रिस्ट व व्ही.व्ही.एस.लक्ष्मण)

चेन्नई सुपर किंग्जचा एकही गडी न गमावता हा दुसरा विजय होता आणि योगायोगाने हे दोन्ही विजय किंग्ज इलेव्हनविरुध्द आहेत. 10 विकेटने सर्वाधिक 3 विजय रॉयल चॕलेंजर्स बंगलोरच्या नावावर आहेत तर किंग्ज इलेव्हनच्या संघाला चार पराभवांत प्रतिस्पर्धी संघाचा एकही गडी बाद करता आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER