राज्य सरकारने विदर्भातील महसूल अधिकाऱ्यांच्या मुदतीपूर्व केलेल्या बदल्या मॅटकडून रद्द

mantralaya

मुंबई : कोरोनाच्या (Corona) संकटकाळातही राज्य सरकारने विदर्भातील १० तहसीलदार आणि तीन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या केलेल्या होत्या. राज्य सरकारने नियमांना धाब्यावर बसवत या बदल्या केला असल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी केला होता.

बदल्या करण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. यावर सुनावणी करताना या १३ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना रद्द करून तीन आठवड्यांत पूर्ववत पदस्थापना देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महसूल विभागासह राज्य सरकारला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER