मॅट्रोमॅन ऑफ इंडिया करतोय भाजपात प्रवेश!

Matroman of India is joining BJP!

दक्षिणेतल्या राज्यांवर कब्जा करण्यासाठी भाजप मोठी ताकद लावताना दिसतंय. आगामी केरळ विधानसभेकडे भाजपाच लक्षय. केरळात भाजपाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच एका बातमीनं सगळ्यांच लक्ष केरळच्या राजकारणाकडं वळवल. ती म्हणजे ‘मेट्रोमॅन ऑफ इंडिया म्हणून ज्यांची भारतासह जगभरात ओळख आहे. ते ई. श्रीधरन (E. Sreedharan) भाजपात प्रवेश करणार आहेत.

विजय यात्रे दरम्यान करणार पक्ष प्रवेश

केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. बऱ्याच वर्षापासून भाजप केरळात पाय रोवण्याचे प्रयत्न करते आहे. मागे स्थानिक स्वराज्य निवडणूकीत मागच्या वर्षांपेक्षा चांगल्या जागा भाजपला मिळाल्यात. केरळ विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 21 फेब्रुवारीला विजय यात्रा काढण्यात येणार आहे. त्या यात्रेमध्ये ई श्रीधरन राजकीय प्रवासाला सुरुवात करतील. भाजपचे केरळ प्रदेशाध्यश्र के सुरेंद्रन यांनी ही माहिती दिलीये.

का म्हणटलं जातं मॅट्रोमॅन

ई. श्रीधरन यांचं पूर्ण नाव इलाट्टुवलापील श्रीधरन आहे. सध्या त्यांचं वय 89 वर्षे असून त्यांना 58 वर्षांचा धोरण ठरवणे, शहर नियोजन याचा अनुभव आहेत. भारतील मेट्रो प्रकल्प यासाठी त्यांनी देशातील विविध शहरांमध्ये आणि परदेशातील प्रवास केला आहे. श्रीधरन यांना मेट्रो प्रकल्प, रेल्वे, रेल्वे उड्डाणपूल याबद्दल केलेल्या कामासाठी मेट्रोमॅन म्हटलं जाते.

त्यांच्या कारकिर्दीत दिल्ली मेट्रो उभारण्यासाठीतलं योगदान मोठं आहे. शिवाय कोकण रेल्वे उभारणीत ही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अब्दूल कलामांच्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रात पंबंनचा पूल वादळामुळं उध्वस्त झाल्याचा उल्लेख आहे. तो पुल फक्त ४६ दिवसात ई. श्रीधरन यांनी बांधून घेतला. ही मोठी क्रांतीकारी घटना होती.

राष्ट्रपती पदासाठी त्यांच्या नावाची होती चर्चा

मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून माझा राष्ट्रपती पदासाठी विचार होणार नाही. राष्ट्रपती पदासाठी नाव चर्चेत या माध्यमांनी दिलेल्या बातम्या होत्या, असं म्हटलं होते. जरी राष्ट्रपतीपदासाठी विचार झाला तरी वयाचा विचार करुन नकार देईन, असंही ते म्हणाले होते.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने करण्यात आलंय सन्मानित

ई. श्रीधरन यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर करण्यात आलाय. फ्रान्स सरकारनं २००५ला पुरस्कारान सन्मानित केलं होतं. तर २००८सा भारत सरकारने त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला होता. जपानने २०१३ला ‘ऑर्डर ऑफ रायझिगं सन’ या पुरस्काराने त्यांना गौरवलं होतं.

राजकारणात येण्या मागच काय आहे कारण?

हा निर्णय त्यांनी अचानक घेतलेला नाहीये. २०११ला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामान्य जनतेसाठी कामाला सुरुवात केली. एकट्याने काम करण्यावर अनेक मर्यादा येतात. त्यामुळं राजकीय पाठबळ असावं असा त्यांचा विचार होता. केरळात सत्तारुढ डावे आणि विरोधीपक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या कारभारावर त्यांनी अनेकदा नाराजी बोलूनही दाखवली.

“भाजपची विचारधारा अनूकुल आहे. भाजप असा एकमेव पक्ष आहे ज्याच्या सोबत मी स्वतःला जोडून घेवू इच्छितो. भाजपाचा दृष्टीकोन भविष्यमुखी आहे. माझ्या क्षमतांचा वापर राष्ट्राच्या उभारणीसाठी ते करु शकतात.” असं उत्तर त्यांनी एका मुलाखतीत दिलं होतं.

डाव्या नेत्यांशी आहेत संबंध

गेल्या पाच वर्षात कोची मेट्रो आणि पलारीवट्टोम रोड ओव्हर ब्रीजच्या प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी मार्गदर्शकाचे काम केल्याच सांगताना त्यांनी डाव्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ही केले होते. या प्रकल्पामुळे त्यांचे डाव्या विचारधारेच्या नेत्यांशी संबंध असल्याच्या अनेक बातम्या मधल्या काळात येत होत्या. पण त्यांनी नंतर डाव्या नेत्यांशी असलेले संबंध तोडून टाकले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER