आमच्यासाठी मातोश्रीनेच दार बंद केली, आम्ही जाणे बंद केलेले नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - Maharashtra Today

नांदेड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या निवासस्थानीही भेटीसाठी गेले होते. फडणवीस यांच्या या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला. फडणवीस काल शरद पवार (Sharad Pawar)यांना भेटले, एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. राऊतांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं. आमच्यासाठी मातोश्रीनेच दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. पण आपण पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटलो. ही एक सदिच्छा भेट होती असं फडणवीस म्हणाले. तसंच फडणवीस काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चहापान केलं. माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. आमच्या खासदारांनी निमंत्रण दिल्यानंतर मी त्यांच्या घरी चहापानासाठी गेलो. याचा कुणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असं फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button