दीपक केसरकर यांच्यावर मातोश्रीचा पुन्हा कोप

Deepak Kesarkar

सिंधुदुर्ग(प्रतिनिधी): शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर सध्या ‘मातोश्री’ चा कोप झाला असून त्यांना शासकीय बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दीपक केसरकर यांच्यावर सध्या ‘मातोश्री’ चा कोप झाला असून त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेने त्यांना आणखी एक धक्का दिला आहे. सावंतवाडीतून चुरशीच्या निवडणुकीत आमदारकी जिंकल्यानंतर हमखास राज्यमंत्रीपद मिळेल या अपेक्षेत असलेल्या केसरकर यांची झोळी नव्या सरकारमधे रिकामीच राहिली. केसरकर यांना मंत्रीपद न देता ‘मातोश्री’कडून रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी उदय सामंत यांनाच प्रतिनिधित्व देण्यात आले.

दीपक केसरकर यांनी प्रतिष्ठेची केलेली चांदा ते बांदा योजना त्यांच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद करून टाकली. हे कमी म्हणून की काय दिपक केसरकर याना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय बंगला खाली करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत.