मातब्बरांची धावाधाव : उद्या आरक्षण सोडत

Kolhapur Muncipal Corporation

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण (Reservation municipal elections) काढताना २००५, २०१० व २०१५ मधील अनुसूचित जाती (एस.सी.), ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) चे प्रभाग वगळून उद्या सोमवारी सोडत काढली जाणार आहे. परिणामी, ८१ प्रभागांतील आरक्षणाचे भवितव्य सोडतीवरच अवलंबून आहे. कोणत्या प्रभागावर काय आरक्षण पडेल? हे सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. परिणामी, अनेक मातब्बरांचे प्रभाग अडचणीत येण्याची शक्यता आहे. ‘लागली तर लॉटरी’; अन्यथा संबंधितांना नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

८१ प्रभागांपैकी ११ प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यातील ६ महिलांसाठी आरक्षित राहतील. २२ प्रभाग ओबीसीसाठी असून, त्यापैकी ११ महिलांसाठी राखीव असतील. शिल्लक राहणाऱ्या ४८ प्रभागांपैकी २४ प्रभागांवर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ड्रॉ काढण्यात येईल. त्यानंतर शिल्लक राहणारे २४ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. आरक्षण सोडत काढताना गेल्या तीन निवडणुकांतील आरक्षण पडलेले प्रभाग वगळले जाणार आहेत. परिणामी, माजी नगरसेवक व इच्छुकांकडून आपल्या प्रभागात काय आरक्षण पडेल, याविषयी आडाखे बांधले जात आहेत. त्यानुसार हालचालीही सुरू झाल्या आहेत

आरक्षण सोडतीनंतरच ८१ प्रभागांतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. माजी नगरसेवकांना अनुकूल असलेले आरक्षण न पडल्यास ते शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचा मुद्दा व शेजारचाच प्रभाग असल्याने संपर्क यासाठी असा प्रयत्न सुरू आहे. इच्छुकांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. माजी नगरसेवकांबरोबरच इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे.

गेल्या सभागृहातील सुभाष बुचडे, श्रावण फडतारे, डॉ. संदीप नेजदार, माधुरी लाड, अशोक जाधव, स्वाती यवलुजे, कविता माने, अॅड. सूरमंजिरी लाटकर, रत्नेश शिरोळकर, अर्जुन माने, राजाराम गायकवाड, राहुल चव्हाण, स्मिता माने, सीमा कदम, शोभा कवाळे, उमा मोहिते, तेजस्विनी इंगवले, अजित ठाणेकर, अनुराधा

खेडकर, शोभा बोंद्रे, अजित राऊत, जयश्री चव्हाण, इंगळे, संजय मोहिते, मेहजबीन सुभेदार, जय पटकारे, भूपाल शेटे, सविता घोरपडे, जयश्री जाधव, लाला सरिता मोरे, उमा बनछोडे, ईश्वर परमार, हसीना फरास, भोसले, रूपाराणी निकम, वृषाली कदम, विजयसिंह सचिन पाटील, शमा मुल्ला, प्रतिज्ञा उत्तुरे, सविता खाडे-पाटील, दीपा मगदूम, शारंगधर देशमुख, मनीषा भालकर, मुरलीधर जाधव, छाया पोवार, भाग्यश्री शेटके, कुंभार, प्रतीक्षा पाटील, अश्विनी रामाणे, अभिजित नियाज खान, विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, सुनंदा चव्हाण यांच्या प्रभागांतील सोडतीवेळी काहीही आरक्षण पडू शकते. त्यामुळे सर्व पक्षीय नगरसेवकात धाकधूक लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER