कोरोनालाही जिंकून मास्टर ब्लास्टर स्वगृही परत

Sachin Tendulkar - Maharastra Today

क्रिकेटच्या मैदानावर जिंकलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कोरोनालाही (Corona) मात दिली असून तो सुखरूप स्वगृही परतला आहे. आपल्या या लढाईत मदत करणाऱ्या वैद्यकीय पथकाला त्यांच्या अथक परिश्रमासाठी त्याने धन्यवाद दिले आहेत.

सचिन २७ मार्च रोजी कोरोनाबाधित आढळून आला होता आणि त्यानंतर तो खबरदारी म्हणून २ एप्रिल रोजी दवाखान्यात भरती झाला होता. सचिनच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य निगेटिव्ह आले होते.

यासंदर्भात सचिनने आपल्या ताज्या ट्विटमध्ये म्हटलेय की, मी नुकताच हॉस्पिटलमधून घरी परतलोय आणि विश्रांती व उपचार घेताना स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. मला सदिच्छा देणाऱ्या व माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. माझी उत्तम प्रकारे काळजी घेणाऱ्या मेडिकल स्टाफचा मी आभारी आहे. गेल्या वर्षभरापासून अतिशय कठीण परिस्थितीत ते काम करत आहेत.

कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होण्याच्या काही दिवस आधीच सचिनने काही प्रदर्शनी टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंडिया लिजेंडस संघाचे विजयी नेतृत्व केले होते. त्या मालिकेत खेळलेले युसुफ पठाण व इरफान पठाण ही भावंडेसुद्धा  बाधित असल्याचे आढळून आले होते. रायपूर येथील त्या सामन्यांना प्रेक्षकांची उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button