ठाण्यातील मुंब्रा रुग्णालयात भीषण आग; ४ रुग्णांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांची माहिती

Massive fire at Mumbra Hospital in Thane

ठाणे :- ठाण्यातील मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये एकूण ४ जण दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माहितीनुसार, या रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये १४ तर ICUमध्ये ६ रुग्णांवर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले.

मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली. यास्मिन शेख (४६वर्षे), नवाब शेख (४७वर्षे), हलिमा सलमानी (७०वर्षे), हरीश सोनावणे (५७वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले की, “काही वेळापूर्वी ठाण्याती मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्री भीषण आग लागली. याचे कारण अद्याप कळले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आग लागली तेव्हा अनेक रुग्ण होते. या आगीत काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती पोलीस जाहीर करतील. या रुग्णालयातील रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. ICUमध्ये ६ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी काही रुग्ण गंभीर आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button